''पालघर (Palghar) येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी 2 साधू, 1 ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल'', असे अश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. पालघर प्रकरणावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
पालघर येथील घटना गुरुवारी रात्री घडली होती. मुंबईतून कारमधून निघालेल्या तीघांना पालघर येथे एका जमावाने अडवले. त्यांना चोर समजून बेदम मारहाण करण्यात आली. या वेळी गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही जमावाने मारहाण करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. घटनेला दोन दिवस उलटून गेल्यानंतर प्रसारमाध्यमं आणि विरोधकांकडून हे प्रकरण आक्रमकरित्या लाऊन धरले जात आहे. दरम्यान पालघरमधील घटना ही लज्जास्पद असून दोषींवर कारवाई होणारचं अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री ट्विट
पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 19, 2020
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पालघर प्रसरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''मुंबईहून सूरतला निघालेल्या तीघांची पालघर येथील हत्येची राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन हल्ल्यात सामील 101 जणांची अटक केली गेली आहे व उच्च स्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. कुणीही या घटनेचं विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करत नाही यावरही सरकार लक्ष ठेऊन आहे.'' (हेही वाचा, Palghar Lynching: पालघर येथे जूना आखाड्यातील दोन साधू व त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणी, BJP कडून उच्च स्थरीय चौकशीची मागणी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल)
गृहमंत्री ट्विट
मुंबईहून सूरतला निघालेल्या तीघांची पालघर येथील हत्येची
राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन हल्ल्यात सामील १०१ जणांची अटक केली गेली आहे व उच्च स्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. कुणीही या घटनेचं विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करत नाही यावरही सरकार लक्ष ठेऊन आहे.#LawAndOrderAboveAll
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 19, 2020
गृहमंत्री ट्विट
हल्ला करणारे व ज्यांच्या वर हल्ला झाला या पैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत. उगाचच समाजात/ समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिस व @MahaCyber1 ला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.#LawAndOrderAboveAll
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 19, 2020
दरम्यान, हल्ला करणारे व ज्यांच्या वर हल्ला झाला या पैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत. उगाचच समाजात/ समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिस व महारष्ट्र सायबरला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत, असेही अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.