मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकास कोरोना व्हायरस संसर्ग
उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे (Photo Credit: IANS)

राज्याचे मुख्यमंत्री (Chief Ministe) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांच्याही दोन सुरक्षारक्षकांना काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. आता रश्मी ठाकरे यांच्याही सुरक्षा रक्षकाला कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार रश्मी यांच्या एका सुरक्षा रक्षकाला कोरोना व्हायरस संक्रमन झाले आहे. या सुरक्षा रक्षकाची कोरोना व्हायरस चाचणी दोन दिवसांपूर्वी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

प्रप्त माहितीनुसार, ज्या सुरक्षा रक्षकाची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तो सुरक्षा रक्षक रश्मी यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या इतरही कर्मचाऱ्यांची चाचणी होणार असल्याचे समजते. (हेही वाचा, Shivraj Singh Chouhan COVID19 Positive: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह)

दरम्यान, या आधीही मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान 'मातोश्री' असलेल्या कलानगर परिसरातील काही पोलिसांना कोरोना व्हायरस संक्रमन झाल्याचे पुढे आले होते. त्यानंतर घबरदारीचा उपाय म्हणून गेले काही काळ उद्धव ठाकरे हे आपल्या वाहनाचे सारथ्य स्वत:च करताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या वाहन चालकाला काही दिवस रजा दिल्याचे समजते.