कोरोनाच्या संकट काळात घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरीच करावे. जिथे शक्य नाही तिथे मोठय़ा प्रमाणात कृत्रिम तलाव निर्माण करावेत व तेथेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन विसर्जनाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच महापालिका यंत्रणेकडे गणेशमूर्ती दान कराव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) केले आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी आज महालक्ष्मी मंदिराजवळ (Mahalakshmi Temple) मुंबई महानगरपालिकेने (BMC) ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी करून त्याचे कौतूक केले आहे. याआधी त्यांनी नेपीयन्सी रोड प्रियदर्शनी पार्क येथील गणेशमूर्ती संकलन केंद्रालाही भेट दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजर करणारे सण यावर्षी रद्द किंवा लॉकडाऊनच्या निर्बंधांखाली साजरे कारावे लागले आहे. यामुळे यंदाचा गणेशोत्सवदेखील अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक उपाय योजना राबवल्या जात आहे. यातच मुंबई महानगरपालिकेने ट्रकमध्ये फिरत्या तलावाची निर्मिती केली आहे. ज्यामुळे विसर्जनाच्या ठिकाणी कमी गर्दी होण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणपती विसर्जन घरच्या घरीच करण्यात यावे; नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे नागरिकांना आवाहन
ट्वीट-
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महालक्ष्मी मंदिराजवळ @mybmcWardD ने ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली व कौतुक केले. तत्पूर्वी त्यांनी नेपीयन्सी रोड प्रियदर्शिनी पार्क येथील गणेश मूर्ती संकलन केंद्रालाही भेट दिली. pic.twitter.com/rRKnTheJWV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 23, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. या काळात गर्दी होणार नाही, करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत टाळेबंदीच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, असे आदेश उद्घव ठाकरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. महत्वाचे म्हणजे, यावर्षी मुंबई महानगरपालिकेने गणपती विसर्जनासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, समुद्र किंवा तलावावर नागरिकांना थेट गणेश विसर्जन करता येणार नाही. नैसर्गिक किंवा कृत्रीम विसर्जन स्थळे आहेत तेथे 1 ते 2 किमीच्या परिघातील नागरिकांनीच गणेश विसर्जनासाठी जाता येणार आहे. ज्या नागरिकांना जवळचे विसर्जन स्थळ नसेल त्यांनी महापालिकेच्या मूर्तीसंकलन केंद्रात गणेशमूर्ती द्यावी लागणार आहे. प्रत्येक विभागात किमान 7-8 मूर्ती संकलन केंद्रे सुरु केली जाणार आहेत. ही केंद्रे मैदान, सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप अशा ठिकाणी असतील.