महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाबाधितांची सख्या झपाट्याने वाढू लागली आहे. परिणामी, संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारे सण यावर्षी लॉकडाऊनच्या निर्बंधांखाली पार पाडावी लागली आहेत. यामुळे यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गेणशोत्सव (Ganeshotsav 2020) साध्या पद्धतीने साजरा करून गणपती विसर्जन घरच्या घरीच करावे, असे आवाहन नाशिक (Nashik) आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी नागरिकांना केले आहे.
नाशिक शहरांमध्ये सातशेहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. तर, घरगुती गणपती बसवणाऱ्यांची संख्या 2 लाखांच्या जवळपास आहे. महत्वाचे म्हणजे, विसर्जनाच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळू शकते. परिणामी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे यावर्षी गणपती विसर्जन घरच्या घरीच करण्यात यावे, असे आवाहन विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिककरांना केले आहे. हे देखील वाचा- Ganesh Chaturthi 2020: गणेश चतुर्थी निमित्त मुंबईच्या लालबागचा राजा गणपती मंडळात आरोग्य उत्सवाला सुरुवात; रक्त आणि प्लाझ्मा दान कॅम्पचे आयोजन
ट्वीट-
#Corona विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा #गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून, गणपती विसर्जनही घरच्या घरीच करण्याचे आवाहन : पोलीस आयुक्त @vishwasnp @InfoDivNashik @nashikpolice#GaneshaChaturthi2020 #StaySafe pic.twitter.com/JW3iWNu0Bn
— DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK (@InfoNashik) August 22, 2020
सध्या महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट वावरत आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ज्यामुळे बऱ्याच ठिकाणी कडक लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले मुंबई शहर नियंत्रणात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, राज्यातील इतर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे.