Mumbai Airport (Photo Credit: PTI)

CSMIA Handles Record 1,007 Flight: मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) प्रशासनाने एकाच दिवशी 1007 विमानांचे यशस्वी उड्डाण आणि लॅंडींग करुन विक्रम केला. विमानतळाने ही कामगिरी शनिवारी (८ डिसेंबर) केली. या आधी याच विमातळावर 24 तासात 1003 विमानांचे उड्डाण आणि लॅंडींग झाले होते. मुंबई विमानतळाचे प्रवक्त्यांनी माहिती देताना शनिवारी (८ डिसेंबर) 1007 विमानांनी आगमन-प्रतिगमन केल्याचा वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, एकाच दिवशी इतकी विमाने वाढण्याच्या कारणाबाबत त्यांनी काहीच खुलासा केला नाही.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी यांची कन्या ईशा अंबानी (Isha Ambani ) हिचा विवाह आनंद पीरामल याच्यासोबत होत आहे. या विवाहसोहळ्यापूर्वीचे काही कार्यक्रम राजस्थान येथील उदयपूर येथे संपन्न होत आहेत. या कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यासाठी विशेष /चार्टर्ड विमानांनी आलेल्या पाहुण्यांमुळे विमानतळावर विमानांची रहदारी वाढल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अनेक राजकीय नेते, उद्योपती आणि बॉलिवूड सेलिब्रेटी या सोहळ्याला प्रायव्हेट विमानांनी पोहोचले. या सोहळ्यासाठी अमेरिकेची माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटनही उपस्थित होत्या. (हेही वाचा, हवाई प्रवासादरम्यान महिला बाळंत, जकार्ताला जाणाऱ्या विमानाचे मुंबईत एमरजन्सी लॅंडीग)

ईशा आंबानी आणि आनंद पीरामल यांचा विवाहसोहळा मुंबई येथे 12 डिसेंबर रोजी अंबानी यांचे निवासस्थान एंटिलिया येथे पार पडत आहे. दरम्यान, या विवाहापूर्वी राजस्थानातील उदयपूर येते संपन्न होत असलेल्या कार्यक्रमासाठी अनेक सेलिब्रेटी, उद्योजक, देशविदेशातील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.