Ajit Pawar And Chagan Bhujbal (Photo Credits: FB)

'मी पुन्हा येईन' असे म्हणत मुख्यमंत्रिपदाच्या गादीवर विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  ही घटना म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणात झालेला मोठा स्फोट होता अशीच म्हणावी लागेल. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या नकळत भाजपशी हातमिळवणी करुन सरकार स्थापन केल्याची अनेकांना रुचले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवारांसह (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना ही गोष्ट पटली नाही. त्यामुळे अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) अजित पवारांच्या भेटीसाठी गेले होते. दीड तास या दोघांमध्ये चर्चा रंगली. चर्चेनंतर छगन भुजबळ यांनी अजित पवारांशी (Ajit Pawar) झालेल्या चर्चेवर संमिश्र प्रतिक्रिया देत अजित पवारांच्या घरवापसीवर सस्पेन्स कायम ठेवला आहे.

आज सकाळी राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी ते त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करणार असून सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. दीड तास या दोघांमध्ये चर्चा रंगली. या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांनी छगन भुजबळांना या चर्चेबद्दल विचारले असता, 'अजून एकदा अजित पवारांची भेट घ्यावी लागेल,' असे सांगत अजित पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत असा नकळतपणे स्पष्ट केले आहे.

हेदेखील पाहा- Maharashtra Government Formation Live News Updates: अजित पवार निर्णयावर ठाम; छगन भुजबळ यांच्यासोबत दीड तास चर्चा

सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सकाळी 10.30 सुमारास सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. दरम्यान त्याआधी भाजपा-एनसीपी सोबत राज्यात स्थिर सरकार देणार असा दावा करणार्‍या अजित पवार यांच्या भेटीला राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्यासह दिग्गज नेते तिसर्‍या दिवशी देखील मनधरणीचे प्रयत्न करणार आहेत.

महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना आज महाराष्ट्राचे सारे लक्ष सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाकडे लागले आहे. शनिवार (23 नोव्हेंबर) दिवशी सकाळी 8च्या सुमारास राष्ट्रपती राजवट हटवत देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी सोहळा पार पडला. आता 30 नोव्हेंबर पूर्वी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. मात्र त्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. आज (25 नोव्हेंबर) दिवशी विधानसभेत तातडीने विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा आदेश मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

ही सुनावणी खूपच निर्णायक असून त्याआधी काका-पुतण्याचे नाते बिघडू नये, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न फुटता एकत्र राहावा यासाठी या पक्षातील सर्व बड्या नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत.