महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असाताना राज्यासमोर आता नवे संकट उभा राहिले आहे. पुणे (Pune) जिल्ह्याच्या पुरंदर (Purandar) तालुक्यातील बेलसरमध्ये (Belsar) झिका विषाणूचा (Zika Virus) पहिला आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे विषाणू जगाला कुठे घेऊन जाणार अशी भिती त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर नागरिकांनी स्वतःची जास्तीत जास्त काळजी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
छगन भुजबळ यांनी नुकतीच नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांना झिका विषाणूबाबत विचारणा करण्यात आली होती. यावर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, हेच तर काही कळत नाही. झिका काय, टीका काय, मिका काय...डेल्टा काय, प्लस काय मायनस काय? रोज नवे नवे विषाणू येत आहेत. एकपाठोपाठ एक येणारे विषाणू जगाला कुठे घेऊन जाणार आहेत? आणि त्याची कारणे काय? उपाय काय औषधोपचार काय? हे शोधता शोधताच दुसरा विषाणू येत आहे. मात्र, यामुळे संपूर्ण जग मास्क आणि लॉकडाऊनखाली आहे. हे देखील वाचा- Shiv Sena: एकच थापड देऊ, पुन्हा कधी उठणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून थेट इशारा
राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळ्याची माहिती दिली होती. झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या 50 वर्षीय महिला रुग्णाची हिस्ट्री तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. एएनआय या वृत्तसंस्थेने देखील यासंदर्भात ट्विट केले होते. झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने शनिवारी (31 जुलै) दिली आहे.
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळूले आहेत. यामुळे राज्यात शनिवारी आढळलेल्या झिका विषाणूच्या पहिल्या रुग्णांनतर सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहेत. राज्यात झिका विषाणूचे जाळे झपाट्याने पाय पसरण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.