Mumbai Police: मौल्यवान वस्तू, दाग- दागिने, पैशांसाठी अनेक मुलींना फसवले; भामट्या नवरेदवाला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश
Image For Representation (Photo Credits: Pixabay)

लॉकडाऊनमध्ये केवळ 50 जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास परवानगी देण्यात आली होती. कोरोना महामारीमुळे अनेक लोकांनी मोजक्या लोकांच्या उपस्थित लग्न कार्य पार पाडले आहे. याचाच गैरफायदा घेत अनेक मुलींशी लग्न करून त्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्या नवरदेवाला पकडण्यात मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यश आले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली आहे. मौल्यवान वस्तू, दाग- दागिने, रोकडसाठी आरोपीने निवडक नातेवाईंकांसमोर पाच तरूणींशी लग्न केल्याची माहिती समोर येत आहे.

आदित्य मेहता असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा नागपूर मधील नेलसन स्क्वेयर छिंदवाडा येथे राहणारा आहे. कोरोनाचा काळाचा फायदा घेत आरोपीने अनेक मुलींशी लग्न करून त्यांची फसवणूक केली आहे. एवढेच नव्हेतर, त्यांचा क्रूरपणे शारीरिक छळ देखील केला आहे. याच काळात आरोपीने मुंबईतील शिक्षक महिलेसोबत लग्न केले. परंतु, त्याचे याआधीच 4 लग्न झाल्याची माहिती मिळताच महिलेच्या पाया खालची जमीन सरकली. त्यानंतर महिलेने आरोपीविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीच्या कुरापतीचे गूढ उकलले आहे. हे देखील वाचा- Mumbai Power Outage: मुंबईमधील मागच्यावर्षीच्या वीज संकटांमागे चीनचा हात, केला होता सायबर हल्ला; अमेरिकन रिसर्च ऑर्गनायझेशनचा दावा

याला मध्य प्रदेश मधील उज्जैन येथून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात कलम 498, 496, 376 आणि 377 म्हणजे घरगुती हिंसाचार, शारीरिक छळ, बलात्कार, मारहाण करणे, अनैसर्गिक शारिरिक छळ यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. तसेच आरोपीने अन्य कोणाला फसवले असेल तर, त्यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.