Chandrashekhar Bawankule | (Photo Credit- Facebook)

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक (Graduate Constituency Election 2020) परभाव भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आता या पराभवाला महिना उलटून गेला तरीही या पराभवाचे विश्लेषण आणि कारणं शोधली, सांगितली जात आहेत. भाजप (BJP) सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नुकतेच या पराभवाचे आणखी एक कारण सांगितले. बावनकुळे यांनी हे करण सांगताना मराठा आरक्षण निर्णयाचा आधार घेतला आहे. भाजप सरकारने मराठा आरक्षण बाबत निर्णय घेतला परंतू, त्याचा फायदा पक्ष आणि पाठिंबा वाढविण्यासाठी करुन घेता आला नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा दौऱ्यवर आहेत. या दौऱ्यात ते पदवीधर मतदारसंघात भाजप का पराभूत झाला याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या वेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, भाजप पराभवाला अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. यात मतदार नोंदणी करताना झालेल्या चुका, काही ठिकाणी उमेदवार अचानक जाहीर करण्यात आला. त्यातून काही नाराजीनाट्यही निर्माण झाले. याशिवाय मराठा आरक्षण निर्णयाचा फायदा पक्ष वाढ आणि लोकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी करुन घेण्यासाठी आम्हाला फारसे यश आले नाही, असेही बावनकुळे म्हणाले. (हेही वाचा, Nagpur Municipal Corporation elections 2021: पदवीधर मतदारसंघात भाजप पराभूत, नागपूर महापालिका निवडणुकीत काय होणार?)

दुसऱ्या बाजूला ज्या मतदारसंघात भाजपची ताकद कमी आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांतून उमेदवार आयात करण्यात आले. त्यामुळे भाजप हा मराठा केंद्री पक्ष होत आहे. तसेच, निष्ठावंतांना संधी मिळत नाही, अशा प्रकारची टीका आणि भाजपची प्रतिमा करण्यात आली का? याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, काही अंशी याची प्रतिक्रिया ओबीसी समाजात उमटली. परंतू, निवडणूक काळात आमच्या सोशल इंजिनिअरींगमध्ये काही चुका झाल्याची भावना काही कार्यकर्त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली असेही बावनकुळे यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, यापुढे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात उमेदवाराचा निवड करताना त्याबाबत आगोदर दोन वर्षे निश्चिती करावी अशी शिफारसस करु असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.