
चंद्रपूर (Chandrapur) येथे असलेल्या ताडोबा वाघ्र प्रकल्पातील वनक्षेत्रात वाघिणीचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आला आहे. तर वाघिणीचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झाला नसून तिची शिकार करण्यात आली असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
वाघ्र प्रकल्पाच्या येथे कक्ष क्रमांक 123 या जागेवर हरणे मारण्यासाठी फासे लावण्यात आले आहेत. याच पद्धतीचे फासे वाघिणीच्या इथे दिसून आले. त्यामुळे वाघिणीचा मृत्यू झाल्याचे सांगितले असून गुरुवारी या वाघिणीची शिकार करण्यात आली असावी असे एका वनाधिकाऱ्याने सांगितले आहे.(हेही वाचा-अमरावती: वाघांच्या मृत्यूचं सत्र सुरूच, चिखलदरा परिसरामध्ये मृतावस्थेत आढळला वाघ)
तर वाघिणीचे वय दीड वर्ष आहे. या प्रकरणी वन अधिकारी तपास करत असून आरोपीवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.