महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज (3 जुलै) नवी कार्यकारणी (BJP Executive Committee) जाहीर केली आहे. दरम्यान यामध्ये 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. याशिवाय 7 प्रमुख मोर्चे आहेत. यांचा समावेश आहे. तर विधानसभेमध्ये आशिष शेलार (Ashish Shelar) मुख्य प्रतोद असतील तसेच माधुरी मिसाळ यांच्यावर देखील प्रतोद पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महामंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे आणि देवयानी फरांदे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच पक्षामध्ये कुणाचीच नाराजी फार काळ टिकत नाही असं देखील चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पंकजा मुंडे यांना केंद्र सरकार मध्ये मोठी जबाबदारी मिळणार - महाराष्ट्र भाजपाची नवी कार्यकारिणी जाहीर करताना चंद्रकांत पाटील यांची माहिती.
दरम्यान पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या पुर्नवसनाबद्दल अद्याप काही गोष्टी गुलदस्त्यामध्ये ठेवल्या आहेत. पण पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
भाजपची कार्यकारिणी जाहीर कशी असेल?
महामंत्री
सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय
उपाध्यक्ष
राम शिंदे, जयकुमार रावळ, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हळवणकर, खा. प्रितम मुंडे, चित्रा वाघ, प्रसाद लाड, कपिल पाटील, भारती पवार
सेक्रेटरी –
माजी आमदार प्रमोद जठार, , संजय पुराम, अॅड धर्मपाल मेश्राम, खासदार रक्षा खडसे, संदीप लेले, स्नेहलता कोल्हे, दयानंद चोरगे, इंद्रिस मुलतानी, अमित गोरखे, नागनाथ निरोवदे, राजेंद्र बकाने, अर्चना तेहटकर
इथे पहा संपूर्ण यादी !
भाजपाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी आज प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. pic.twitter.com/lDoG1j6EnE
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 3, 2020
दरम्यान महाराष्ट्रात सध्या विधानसभेमध्ये भाजपा पक्ष मुख्य विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पद आहे. तर विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.