मुंबईमधून चाकरमनी कोकणात गावाकडे जाण्यासाठी सुरूवात झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाल्याने, थकवणारा रस्ते प्रवास आणि विमानसेवा इतक्यात काही सुरू होण्याची चिन्ह नसल्याने अनेकांनी रेल्वेने जाण्याचा पर्याय निवडला आहे. आरामदायी आणि तुलनेत खिशाला परवडणारा पर्याय म्हणून रेल्वेची निवड केली तरीही गणपतीमध्ये रेल्वेची तिकीट मिळणं कठीण आहे.
प्रवाशांची रेल्वेकडे वाढती गर्दी पाहता या दिवसामध्ये रेल्वेने गणपतीच्या धावणार्या काही गाड्यांना विशेष डब्बे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा रेल्वेने कोकण मार्गावर 200 हून अधिक स्पेशल गाड्या सोडल्या आहेत.
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे सध्याच्या निम्नलिखित गणपति विशेष गाड्यांमध्ये 3 अतिरिक्त अनारक्षित द्वितीय श्रेणीचे डब्बे जोडणार आहे ज्याचे विवरण अशा प्रकारे आहे: pic.twitter.com/pQWPrKfGOj
— Central Railway (@Central_Railway) September 11, 2018
कोणकोणत्या गाड्यांना विशेष डब्बे जोडण्यात आलेत ?
11 आणि 18 सप्टेंबर 2018 या दिवशी लोकमान्य टिळक टर्निमन ते सावंतवाडी विशेषगाडी (01095 )
12 आणि 19 सप्टेंबर 2018 या दिवशी सावंतवाडी हून सुटणारी (01096 )
13 आणि 15 सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्निमनहून सुटणारी,एलटीटी ते सावंतवाडी रोड विशेष (01103 ),
14 आणि 16 सप्टेंबर रोजी सावंतवाडी रोड सुटणारी सावंतवाडी रोड ते एलटीटी (01104) या गाडय़ांना विशेष डब्बा जोडण्यात आला आहे. जोडण्यात आलेले डब्बे हे द्वितीय श्रेणीचे असल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे.