Central Railway | (photo courtesy: archived, edited, symbolic images)

ऐन ऑफिसला जाण्याच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर शहाड (Shahad) येथून कल्याण (Kalyan) स्थानकात जाणारी लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने चालत असून रेल्वे 15 ते 20 मिनीटे उशिराने धावत आहे.

सकाळीच मध्य रेल्वेच्या सेवेत तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेस प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. तर लवकरच मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत होईल असे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी 9 जानेवारीला ही कर्जत-भिवपुरी रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे कर्जतवरुन मुंबईकडे येणाऱ्या लोकलचे वेळापत्रक बिघडलेले दिसले.