मुंबई: मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड; माटुंगा-परळ दरम्यान ट्रेन्सचा खोळंबा
Mumbai Local | Representational Image | (Photo Credits: PTI)

मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएसटीएमकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे परळ ते माटुंगा (Paral-Matunga) दरम्यान 5-6 लोकल एका मागोमाग एक थांबल्या आहेत. मात्र लोकलसेवा ठप्प झाल्याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

मध्य रेल्वे मार्गावरील वाहतुकीच्या खोळंब्यामुळे प्रवाशांना भर उन्हात नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

रेल्वे वाहतूक खोळंबल्याची आजच्या दिवसातील ही दुसरी घटना असून काही वेळापूर्वी बेलापूर-सीएसएमटी लोकल मुंबई सीएसएमटी स्थानकात बफरला धडकल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र या अपघातात कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने रेल्वेसेवा काही काळाने पूर्ववत करण्यात आली.