मुंबई मधील 'या' महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

राज्यातील कोविड-19 रुग्णवाढीच्या (Rising Covid19 Cases) पार्श्वभूमीवर 5 एप्रिलपासून कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानंतर आता रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus), कल्याण (Kalyan), ठाणे (Thane), दादर (Dadar), पनवेल (Panvel), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket) विक्री आजपासून बंद करण्यात आली आहे. तात्काळ हा निर्णय लागू करण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या (Central Railway) सीपीआरओ (CPRO) कडून  देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आलेल्या या स्थानकांवरुन लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. राज्यात कठोर निर्बंध लागू केल्यानंतर परप्रांतियांनी पुन्हा गावाची वाट धरली असून मागील काही दिवसांत रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. परंतु, कोविड संकट नियंत्रणात आणण्यासाठी गर्दी टाळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

ANI Tweet:

(हे ही वाचा: Mumbai Local Service: मुंबई लोकल ट्रेन प्रवासी संख्येत घट, कोरोनाच्या भीतीने नागरिकांनी पाठ फिरवल्याची चर्चा)

दरम्यान, सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावरही निर्बंध घालण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांची चिंता वाढली आहे.