दोन महिन्यांच्या कडक निर्बंधांनंतर राज्यात 7 जून पासून अनलॉक 2 ला सुरुवात झाली. मात्र अद्याप मुंबईची लाईफलाईन असणारी लोकलसेवा सामान्य नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेली नाही. मात्र आता मध्य रेल्वेच्या (Central Railways) मुंबई उपनगरीय नेटवर्क (Mumbai Suburban Network) वर एसी लोकल ट्रेन (AC Local Train) सेवा सुरु करण्यासाठी प्रवाशांकडून अभिप्राय घेण्यासाठी एक ऑनलाईन सर्व्हे सुरु केला आहे. यासाठी मध्ये रेल्वेने ट्विटरवर मराठी आणि इंग्रजीत काही प्रश्न असलेल्या गुगल फॉर्मची लिंक शेअर करत प्रवाशांना आपले मत मांडण्याचे आवाहन केले आहे. यात तिकीटांच्या किंमतीबद्दल प्रश्न आहे. तसंच आवडीचा प्रवास मार्ग निवडीण्याचा पर्याय दिला आहे. त्याचबरोबर प्रवासी मुंबई लोकलसंबंधित एकाहून अधिक मार्ग देखील निवडू शकतात. (Mumbai Local: शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी)
दरम्यान, कोरोना व्हायरसचे संकट कायम असल्याने मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी लवकर सुरु होणार नाहीत, असे महाराष्ट्र सरकारने अलिकडेच स्पष्ट केले आहे. कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट 1 होत नाही तोपर्यंत मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार नाहीत, असे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
Central Railway Tweet:
We Are Listening!
Want to know more about public opinion on AC local services on Mumbai Suburban, a survey is being conducted through Google form (link attached). Kindly fill the form and share your opinion on AC local services.https://t.co/ffbNHGPki7
— Central Railway (@Central_Railway) June 16, 2021
We are conducting a survey for running AC local trains. Kindly fill the link. Also share with all.
AC लोकल ट्रेन चलावन्या साथी आम्ही सर्वे करत आहोत. कृपया करुन लिंक वर माहिती द्या.
AC लोकल ट्रेन चलाने हेती सर्वे के लिए निचले लिंक पर जानकारी दीजिये . https://t.co/JU4zb4fith pic.twitter.com/Q4PgBAGXuV
— DRM - Mumbai Central, WR (@drmbct) June 16, 2021
महाराष्ट्र सरकारच्या अनलॉक प्रक्रीयेत मुंबई तिसऱ्या टप्प्यात आहे. यात सर्व दुकाने सुरु करण्यात आली आहेत. मात्र मॉल, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स अद्याप बंद आहेत. तर मुंबई लोकल सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सुरु ठेवण्यात आली आहे.