सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी इच्छुक उमेदवारांना मिळणार आहे. परंतु येथे शिक्षक पदासाठी रिक्त जागांवर नोकरभरती करण्यात येणार आहे. रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या या सुचनेद्वारे PGT, TGT आणि PRT या पदासाठी नोकरी देण्यात येणार आहे.
तर रेल्वेमधील शिक्षभरती पदासाठी विविध भागामध्ये एकूण 15 रिक्त जागांवर नोकरभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे जाणून घ्या या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया. तसेच इच्छुक उमेदवारांना या नोकरीच्या संधीबाबत मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावरुन अधिक माहिती मिळणार आहे.
>>शैक्षणिक पात्रता-
-PGT पदव्युत्तर, MSC किंवा 50% गुणांसह मास्टर डिग्री, बीएड
-TGT पदवीधर, बीएड
-PRT साठी 50 टक्के गुणांसह 10 वी पास, पदवीधर, BA, BSc डिप्लोमा
>>शिक्षक पदासाठी रिक्त जागा-
PGT- 5
TGT(सायन्स)- 1
PRT (आर्ट्स)- 5
(नवी मुंबई मध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यापासून मेट्रो धावण्याची शक्यता)
तर या नोकरीसाठी 18 ते 65 वर्षापर्यंतच्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. उमेदवारांचा इंटरव्हुव्ह भुसावळ येथे होणार असून अर्जाची फी स्विकारली जाणार नाही आहे. तसेच 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत इंटरव्हुव्ह घेतले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना https://cr.indianrailways.gov.in/ येथे अधिक माहिती देण्यात येणार आहे.