मध्य रेल्वेमार्गावर आज रात्रकालीन जम्बोब्लॉक, जाणून घ्या गाड्यांचे वेळापत्रक
Indian Railways | Representational Image | (Photo Credit: File Photo)

मध्य रेल्वे मार्गावर नवीन सार्वजनिक पादचारी पुलाकरीता गर्डर्सच्या लॉंचिंगसाठी शीव व कुर्ला दरम्यान रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा जम्बोब्लॉक 25-26 जानेवारीला रात्री 1 ते पहाटे 4.50 वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक वेळी अप आणि डाऊन धिम्या लाईनवर, अप आणि डाऊन जलद लाईनवर आणि अप आणि डाऊनच्या हार्बर लाईनवर, वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान हार्बर लाईनवर व घाटकोपर/कुर्ला आणि माटुंगा दरम्यान मेन लाईनवर नवीन सार्वजनिक पादचारी पुलासाठी आणि गर्डर्सच्या लॉन्चिंगसाठी ब्लॉक घेण्यात आला आहे.

या ब्लॉक दरम्यान कोणत्या गाड्या रद्द किंवा वळवण्यात आल्या असून मेन लाईन आणि हार्बर लाईन मार्गावरील गाड्या किती वाजता सुटणार याबाबत सुद्धा वेळापत्रक मध्य रेल्वेने जाहीर केले आहे ते पुढीलप्रमाणे:

>>मेन लाईन:

-कर्जतसाठी सीएसएमटी येतून सुटणारी मेन लाईनची शेवटची लोकल 00.25 वाजता सुटणार आहे.

-सीएसएमटीसाठी ठाणे येथून मेन लाईवनरची शेवटची अप लोकल 00.23 वाजता सुटणार आहे.

-कर्जतसाठी सीएसएमटी येथून सुटणारी मेन लाईनची पहिली लोकल सकाळी 4.48 वाजता सुटणार आहे.

-सीएसएमटीसाठी ठाणे येथून मेन लाईनची पहिली अप लोकल सकाळी 4.56 वाजता सुटेल.(मुंबई: महाराष्ट्र राज्य सडक विकास प्राधिकरणाकडून वांद्रे-वरळी सीलिंकवर फास्टॅग सुरु)

>>हार्बर लाईन:

- पनवेलसाठी सीएसएमटी येथून सुटणारी शेवटची डाऊन लोकल 00.24 वाजता असणार आहे.

-पनवेलसाठी सीएसएमटी येथून पहिली लोकल सकाळी 4.52 वाजता सुटेल.

-सीएसएमटीसाठी पनवेल येथून पहिली अप लोकल 4.29 वाजता सुटणार आहे.

या ब्लॉकसाठी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर ही परिणाम होणार आहे. 26 तारखेला सकाळच्या वेळी सीएसएमटी आणि दादर येथे पोहचणारी अप मेल/ एक्सप्रेस गाड्या त्यांच्या गतंव्य स्थानकांवर 2-3 तास उशिराने धावणार आहेत.