Image For Representation (Photo Credits-Facebook)

मुंबई मध्ये मध्य रेल्वेकडून (Central Railway) या रविवारी देखील मेगा ब्लॉक (Mega Block)  घेण्यात येणार आहे. 13 तासांच्या मेगाब्लॉक मध्ये मुंबई लोकल सोबतच काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांचेही वेळापत्रक विस्कळित होणार आहे. ठाणे-दिवा स्थानकादरम्यान (Thane- Diva) 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी शनिवार ,22 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून 14 तासांचा मेगाब्लॉक सुरू होणार आहे. याकाळात ठाणे आणि दिवा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या या धीम्या मार्गावरून चालवल्या जाणार आहेत. यामध्ये काही लोकल रेल्वेच्या फेर्‍या देखील रद्द होणार आहेत.

ब्लॉक दरम्यान कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या काही ट्रेन्समध्ये बदल केले जाणार आहे. दादर-सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस नेहमीप्रमाणेच डाऊन फास्ट वरून चालवली जाणार आहे. पण कोकणात जाणार्‍या अन्य मेल एक्सप्रेस या ब्लॉक दरम्यान ठाणे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर येणार आहेत. हे देखील नक्की वाचा: Central Railway Installing CCTV: मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी उचलले पाऊल, आता सर्व महिला डब्यांमध्ये बसवणार सीसीटीव्ही.

मध्य रेल्वेचं ट्वीट

मध्य रेल्वेवरील ब्लॉक मुळे 22 जानेवारी दिवशी लांब पल्ल्याच्या 3 तर 23 जानेवारी दिवशी लांब पल्ल्याच्या 7 ट्रेन्स रद्द झाल्या आहेत. तर काही लांब पल्ल्यांच्या ट्रेन्स या पनवेल स्थानकातून सुटतील आणि शेवटचा थांबा घेतील. यामध्ये तिरूअनंतपुरम- लोकमान्य टिळक टर्मिनन्स नेत्रावती एक्सप्रेस, मडगाव मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस आणि मुंबई - मडगाव मांडवी एक्सप्रेस यांचा समावेश आहे.