प्रवाशांसाच्या सोयीसाठी कल्याण-नाशिक लोकलसेवा सुरु करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. त्यासाठी अधिक क्षमतेच्या लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाल्या. या लोकलची चाचणी करण्यात आली. मात्र कसारा घाटातील प्रवासासाठी 'सॉफ्टवेअर अपग्रेडशन' करण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता ही तांत्रिक पूर्तता होईपर्यंत लोकलसेवा सुरु होण्यासाठी काहीसा वेळ लागणार आहे. मुंबई ते पुणे आणि नाशिक लोकल ट्रेनची चाचणी जानेवारी महिन्यात होणार
कुर्ला कारशेडमध्ये या अधिक क्षमतेच्या लोकल्स तांत्रिक दृष्ट्या सुसज्ज करण्यात आल्या. मात्र कसारा घाटातून लोकल ट्रेनने प्रवास करणे कठीण होते. त्यामुळे कसारा घाटातील चाचणी यशस्वी झाल्यानंतर लोकल सेवा सुरू करण्यात येईल. या चाचणीसाठी दीड ते दोन महिने लागण्याची शक्यता असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे कल्याण-नाशिक लोकल सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना काहीशी वाट पाहावी लागणार आहे. (मध्य रेल्वेची मुंबई-नाशिक लोकलसेवा चाचणी यशस्वी, कल्याण - इगतपुरी दरम्यान धावणार लवकरच ट्रेन)
नव्या लोकल्सचे वैशिष्ट्य
अत्यावश्यक ब्रेक सिस्टीम, इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट्स ट्रेन, 32 चाकांना पार्किंग ब्रेकची सुविधा ही या नव्या लोकल्सची वैशिष्ट्ये आहेत. या लोकल्स ताशी 100 किमी वेगाने धावतील.