आता लवकरच मुंबईहून नाशिक (Mumbai to Nashik) आणि पुण्याला (Mumbai to Pune) लोकलने जाता येणार आहे. या मार्गावर लोकलची चाचणी फेरी जानेवारी महिन्यात पार पडणार आहे.
मुंबई, पुणे, नाशिक ही शहरं आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. त्यामुळे या शहरातून मोठ्या प्रमाणावर लोक नोकरी किंवा शिक्षकासाठी प्रवास करत असतात. मुंबई, पुणे, नाशिक या शहरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. पंचवटी, डेक्कन क्विन, प्रगती, राज्यराणी, सिंहगड यांसारख्या अनेक एक्स्प्रेस ट्रेन्स मुंबई, पुणे, नाशिक प्रवासासाठी उपलब्ध आहेत. मात्र या ट्रेन्स फक्त सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत उपलब्ध असल्याने यांच्यात तुफान गर्दी असते. खूशखबर! सेंट्रल रेल्वेवरुन लवकरच धावणार 'मुंबई-पुणे-मुंबई' लोकल
त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेचे निवृत्त लोको प्रमुख इंस्पेक्टर वामन संगाळे यांनी या तीन शहरांसाठी विशेष लोकल ट्रेन्स असाव्या, अशी मागणी केली. मात्र खंडाळा आणि कसारा घाटातून लोकल ट्रेनने प्रवास करणे कठीण असल्याने RDSO (Research Design and Standards Organisation) यांनी लोकल ट्रेनमध्ये काही विशेष बदल करण्याचे सुचविले.
यावर रेल्वे प्रशासन आणि RDSO यांनीही सकारात्मक भूमिका मांडली आणि मध्य रेल्वेला काही सूचना दिल्या. यावर मध्य रेल्वेने इंटीग्रल कोच फॅक्टरी (Integral Coach Factory) यांना पत्र लिहून या मार्गावरुन प्रवास करण्यासाठी लोकल ट्रेनमध्ये विशिष्ट बदल करण्याचे सूचित केले.
या सर्व प्रक्रियेनंतर जानेवारी महिन्यात मुंबई-पुणे-नाशिक या लोकल ट्रेनची चाचणी फेरी होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास मुंबई-पुणे-नाशिक प्रवास लोकलने करणे शक्य होणार आहे.