मध्य रेल्वेची सेवा मुरबाड-अलिबाग पर्यंत विस्तारणार; कल्याण ते मुरबाड हा नवा मार्ग लवकरच सुरु
Representational Image (Photo Credits: PTI)

मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वेच्या सेवेचा विस्तार होणार असून आता मध्य रेल्वे मुरबाड ते अलिबागपर्यंत धावणार आहे. इतकंच नाही तर लवकरच कल्याण ते मुरबाड (Kalyan-Murbad) हा नवा मार्ग सुरु करण्यात येईल. या मार्गाला रेल्वे मंत्रायलाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी दिली. कल्याण-डोंबिवलीकरांसाठी आजपासून मध्य रेल्वेने सुरु केली 15 डब्यांची लोकल सेवा

कल्याण ते मुरबाड या नव्या मार्गाची खासियत:

# कल्याण ते मुरबाड हा 28 किलोमीटरचा मार्ग असून त्यासाठी 726 कोटी 45 लाखांचा खर्च येणार आहे. या मार्गावर कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर ही स्थानके आहेत. त्यात आता कंभा रोड, आप्टी, पोटगाव, मुरबाड स्थानकांचा समावेश होईल.

# कल्याण ते मुरबाड मार्गादरम्यान 39 छोटे पूल, 7 बोगदे, 5 उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. हा मार्गाचे काम 31 मार्च, 2023 पर्यंत पूर्ण होईल.

मध्य रेल्वेने परळ टर्मिनस, 15 डब्यांची लोकल, पुणे ते नागपूर 'हमसफर एक्सप्रेस' या नव्या सुविधा सुरु केल्या आहेत. तर पेण ते थळ आणि जासई-उरण विद्युतीकरण, कुर्ला, सायन, दिवा, जीटीबी नगर, महालक्ष्मी, पालघर या स्थानकात पादचारी पूल आणि नेरळ ते माथेरान दरम्यान रेल्वेला पारदर्शक डबे या सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. तसंच अलिबाग ते मुंबई हा प्रवास जलद होण्यासाठी अलिबाग ते पेण असा मार्ग उभारण्यात येणार आहे.

नुकतेच उद्घाटन झालेल्या परळ टर्मिनसमधून 32 लोकल फेऱ्या चालवण्यात येतील. पश्चिम रेल्वेची चर्चगेट ते डहाणूपर्यंत असलेल्या सेवेचा विस्तार सुरतपर्यंत करण्याचा विचार सुरु आहे.