महाराष्ट्रामध्ये दुष्काळावर (Drought) मात करण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता (Model Code of Conduct) शिथील केल्यानंतर आता केंद्र सरकारने अधिक मदत जाहीर केली आहे. केंद्र सरकारने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 2160 कोटीची मदत जाहीर केल्याने आता सरकारकडून एकूण 4248.59 कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मिळालेल्या अधिकच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी लोकसभा निवडणूक 2019 आचारसंहिता शिथिल
देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्र सरकारचे आभार
महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ, केंद्र सरकारकडून आणखी 2160 कोटी रूपये मदतीपोटी प्राप्त झाले.
मी यासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचा अतिशय आभारी आहे !
आतापर्यंत 4248.59 कोटी रूपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत. pic.twitter.com/qbWV9SCKmz
— Chowkidar Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 7, 2019
राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असल्याने दुष्काळाचा सामना करणं अधिक बिकट होत आहे. सध्या विहिरी खणणे, पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती, कॅनालची देखभाल इत्यादी कामे ही तीव्र उन्हाळ्यातच करावी लागतात. राज्य सरकारने 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. सध्या या गावांमध्ये दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे.