Sindhudurg Girl Swapnali Sutar: सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील दारिस्ते गावात नेटवर्क नसल्याने डोंगरात झोपडी बांधून ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करणाऱ्या स्वप्नाली सुतार (Swapnali Sutar) हिला केंद्र सरकारने (Central Government) मोठी मदत केली आहे. स्वप्नालीला भारत नेटच्या मदतीमुळे घरी नेटवर्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्वप्नालीच्या या समस्येची दखल केंद्र शासनाने घेतल्याने स्वप्नालीने सर्वांचे आभार मानले आहेत.
स्वप्नाली 12 वी नंतर पशुवैद्यकीय पदवीच शिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेली. ती मुंबईतील दिवा भागात भावांसोबत राहत होती. परंतु, लॉकडाऊनमुळे तिला गावी यावं लागलं. गावात आल्यानंतर काही दिवसांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु झाला. परंतु, दारिस्ते हे गाव दुर्गम खेडेगाव असल्याने तेथी तिला नेटवर्कचा अडथळा येऊ लागला. (हेही वाचा - Coronavirus Update: गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील 351 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, तर 3 जणांचा मृत्यू)
#सिंधुदुर्ग जिल्ह्यातील #दारिस्ते गावात नेटवर्क नसल्याने डोंगरात झोपड बांधून ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करणाऱ्या #स्वप्नाली सुतार हिला #भारत नेटच्या मदतीमुळे घरी नेटवर्क उपलब्ध करून दिले आहे. स्वप्नालीच्या या समस्येची दखल केंद्र शासनाने घेतल्याने स्वप्नालीने सर्वांचे आभार मानले आहेत. pic.twitter.com/uajK2G8DSN
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 25, 2020
दरम्यान, स्वप्नालीने गावात इंटरनेट न मिळाल्याने तिने गावाजवळच्या डोंगरात तिने इंटरनेट मिळते का? याचा शोध घेतला. अखेर तिला उंच डोंगरात इंटरनेट मिळालं. त्यानंतर तिने तेथे एका झोपडीत ऑनलाईन लेक्चर्स अटेंन्ड करण्यास सुरूवात केली. स्वप्नालीच्या जिद्द आणि चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.