Anti-Corruption Bureau: उपायुक्त नितीन ढगे यांच्या घरी कोट्यवधी रुपयांची रोखड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
Arrest | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

जात पडताळणी (Caste Verification) उपायुक्त (Caste Verification Deputy Commissioner) नितीन ढगे (Nitin Dhage) यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांची रोखड सापडली आहे. एका लाच प्रकरणात एसीबीने नितीन ढगे यांना रंगेहात पकडले होते. त्यानंतर एसीबीने (ACB) त्यांच्या घरी शोध मोहीम राबवली. या मोहिमेवेळी एसीबीला ढगे यांच्या घरी सुमारे एक कोटी रुपयांपेक्षाही अधिक रोख रक्कम आणि तब्बल दीड कोटी रुपयांच्या मालमत्तांची कागदपत्रे सापडली असल्याची माहिती आहे.

नितीन ढगे यांनी एका प्रकरणात तब्बल 8 लाख रुपयांची मागणी केली होती. या एकूण लाचेपैकी दोन लाख रुपये रोख घेताना ढगे यांना एसीबीने रंगेहात पकडले होते. या वेळी एसीबीने त्यांना अटकही केली होती. त्यानंतर एसीबीने आपली शोधमोहीम अधिक तीव्र करत कारवाई केली. ढगे यांच्या घरी शोधमोहीम राबवली. या वेळी एसीबीला तब्बल एक कोटी रुपयांपेक्षाही अधिक रक्कम सापडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. एसीबीच्या कारवाईमुळे चांगलीच प्रसासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा, नागपूर: सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर दांपत्याविरूद्ध बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल)

प्राप्त माहितीनुसार, नितीन ढगे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उपायुक्त आहेत. त्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे सदस्यत्वही आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे जातपडताळणी करुन ते वैध करुन घेण्यासाठी जात पडताळणी कार्यालयाकडे अर्ज केला होता. या वेळी संबंधित व्यक्तीकडे जातपडताळणीबाबत आठ लाख रुपये लाच मागण्यात आली. यावर अर्जदार व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीवरुन एसीबीने कारवाई केली असात ढगे हे आयतेच जाळ्यात सापडले. नितीन ढगे यांना रंगेहात पकडण्यासाठी एसीबीने सापळा रचला होता. या प्रकरणात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढगे हे सद्या एसीबीच्या ताब्यात असून, त्यांची चौकशी सुरु आहे.