Sameer Wankhede | (Photo Credit: ANI)

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना Caste Scrutiny Committee कडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर घेण्यात आलेले आक्षेप निकाली काढण्यात आले आहेत. समीर वानखेडे जन्मतः मुस्लिम नसल्याचं Caste Scrutiny Committee कडून सांगण्यात आले आहे. सोबतच समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर केले नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समीर यांचे पूर्वज हिंदू धर्मीय आहेत त्यानुसार त्यांची जात Mahar -37 Scheduled Caste असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे समीर हे अनुसुचित जातीमध्ये असल्याने त्यांच्या विरूद्धच्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचं सांगण्यात आले आहे.

समीर वानखेडे यांना क्लिन चीट मिळाल्याने नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे. कारण नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचे जुने फोटो, जात प्रमाणपत्र सोशल मीडीयामध्ये शेअर करत त्यांनी आरक्षणाचा गैरफायदा घेत सरकारी नोकरी बळकवल्याचा आरोप केला होता. हे देखील नक्की वाचा: Nawab Malik on Sameer Wankhede: 'यह क्या किया तुने?'; नवाब मलिक यांनी शेअर केला समीर वानखेडे यांचा आणखी एक फोटो सोबतच नवा दावा .

ANI Tweet

समीर वानखेडे हे ex-NCB Zonal Director होते. मुंबई मध्ये ड्रग्स रॅकेट मध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. या कारवाईमध्ये एका प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला देखील त्यांनी अटक केली होती. त्यानंतर समीर वानखेडे अधिक प्रकाश झोकात आले होते. समीर वानखेडे यांचा मुंबई मध्ये एनसीबी मधील कार्यकाळ संपताच डीजीटीएस चेन्नई येथे बदली करण्यात आली होती.