Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

शिर्डीला (Shirdi) साईबाबांच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. साईंच्या दर्शनासाठी जाणा-या साईभक्तांच्या गाडीला औरंगाबाद-नगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 प्रवासी जागीच ठार झाले असून 2 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, ही साईभक्त शुक्रवारी रात्री कारने शिर्डीच्या दिशेने निघाले होते.

प्राप्त माहितीनुसार, जालना तालुक्यातील शेवली येथून शुक्रवारी रात्री नऊ वाजता सर्व मित्र कारने साईदर्शनासाठी शिर्डीस निघाले होते. औरंगाबाद-नगर महामार्गावर चालकाचा वाहनावरीस ताबा सुटून कार थेट झाडावर आदळली. मध्यरात्री रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. घटनेमुळे शेवली गावावर शोककळा पसरली आहे.

हेदेखील वाचा- ऊसतोड कामगार घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला धुळ्यामध्ये भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 24 जण जखमी

अमोल गवळकर (18),आकाश शीलवनत (19),आकाश मोरे (20) आणि दत्ता डांगे (24) या चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर किरण गिरी (21) आणि संतोष राऊत (22) हे गंभीर जखमी आले आहेत. जखमींना औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे धुळ्यामध्ये मध्य प्रदेशातील ऊसतोड मजूर घेऊन येणाऱ्या पिकअप व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात 7 मजूर ठार झाले आहेत. या अपघातात 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 महिला आणि 5 मुलांचा सहभाग आहे. या पिकअप व्हॅनमध्ये एकूण 31 कामगार होते. उस्मानाबादला जात असताना हा भीषण अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.