Captain Shiva Chauhan | (Photo Credit - Twitter/ANI)

फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे (Fire and Fury Corps) अधिकारी कॅप्टन शिवा चौहान (Captain Shiva Chauhan) यांनी सियाचीन ग्लेशियरच्या सर्वोच्च युद्धक्षेत्रात तैनात होणारी पहिली महिला अधिकारी बनून इतिहास रचला आहे. त्यांच्या या कामगिरीची देशभर चर्चा होत आहे. कॅप्टन शिवाकडे मुलींसाठी आदर्श म्हणून पाहिले जाते. भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून कॅप्टन शिवा चौहानच्या या यशाची माहिती दिली आहे. फायर अँड फ्युरी सॅपर्सच्या कॅप्टन शिवा चौहान या जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या कुमार पोस्टवर कार्यरत असलेल्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.