Ashish Shelar And Jitendra Awhad (Photo Credits: Facebook)

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का?अशा शब्दात भाजपचे मोठे नेते आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना निशाणा करताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा शाब्दिक अस्त्रे उगारली आहेत. आशिष शेलार यांना उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी "इथे खरोखरच उद्धव ठाकरे यांच्या बापाचे राज्य आहे, जितेंद्र आव्हाड यांच्या बापाचे राज्य आहे, आम्ही आमचा बाप शोधायला गुजरात ला जात नाही" अशा कठोर शब्दात सुनावले आहे. "आम्ही काळ्या मातीला आई मानतो आणि मराठी माणसाला आमचा बाप मानतो. हे मराठी मनाचं राज्य आहे, असं देशभरात-जगभरात सांगणाऱ्यांची आम्ही औलाद आहोत" असे देखील आव्हाड यांनी म्हंटले आहे. वचन मोडणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, आम्ही ते स्वीकारायला तयार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वास्तविक उद्धव ठाकरे यांनी एनआरसीच्या मुद्द्यावरून बोलताना "नागरिकत्व सिद्ध कारण हे केवळ मुस्लिमांना नाही तर हिंदूंना देखील कठीण आहे असे म्हणत आपण काहीही झालं तर महाराष्ट्रात NRC लागू होऊ देणार नाही अशी भूमिका मांडली होती,  ज्यावर आशिष शेलार यांनी कायदा लागू न होऊ द्यायला हे काय मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का या शब्दात टीका केली होती. यावर जयंत पाटील यांनी सुद्धा भाजपने बाप काढण्याच्या इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची आवश्यकता नाही कारण ज्यांचा बाप काढत आहेत त्यांनी मनात आणलं तर मुंबईत फिरणं सुद्धा अशक्य होईल असा इशारा शेलार यांना दिला आहे.

पहा काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

दरम्यान यापूर्वी सुद्धा CAA च्या वादावरूनच जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका करत बाप काढण्याची भाषण केली होती. जेव्हा आमचा बाप इन्कलाबच्या घोषणा देत फाशीला मिठी मारत हता तेव्हा तुमचा बाप बिर्टिशांचे तळवे चाटत होता अशा शब्दात आव्हाड यांनी आपला विरोध दर्शवला होता. या वक्त्यावरून तापलेला वाद अजून मिळत नसताना आता शेलार विरुद्ध आव्हाड असे नवे शाब्दिक युद्ध सुरु झालेले आहे.