सिन्नर-शिर्डी महामार्गावर (Sinner-Shirdi Highway) पाथरे शिवारामधील ईशानेश्वर मंदिराच्या जवळ आज (13 जानेवारी) सकाळी भीषण अपघात आहे. बस आणि ट्रक यांच्यामध्ये टक्कर झाल्यानंतर हा अपघात झाला आहे. बसमध्ये 50 जण प्रवास करत होते. शिर्डीला दर्शनाला जाणार्य या बसमधील काही प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार पाथेर जवळ बस आणि ट्रक यांच्यात एकमेकांसमोर टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. जखमींना नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. मटा च्या वृत्तानुसार, 4-5 जण दगावले आहेत. त्यामध्ये 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे. नक्की वाचा: West Bengal Bus Accident Video: पश्चिम बंगालमध्ये बस अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, 1 ठार 40 जखमी, Burdwan येथील घटना.
पहा व्हिडीओ
10 Pilgrims killed as Luxury Bus rams into bus on #Nashik Sinnar Highway. Passenger were going to #Shirdi. 40 others injured. pic.twitter.com/7OuTbcQ4ii
— Manoj Khandekar (@manojkhandekar) January 13, 2023
ठाण्यामधून काही साईभक्त बाबांच्या दर्शनासाठी निघाले होते पण नाशिकच्या सिन्नर मध्येच त्यांच्यावर काळाने घात केला. अपघाताची माहिती मिळताच गावकर्यांनी धावाधाव केली. काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तातडीने पोलिस आणि अॅम्ब्युलंस घटनास्थळी आली आणि त्यांनी जखमींना मदत देण्यास सुरूवात केली. बसचा या अपघातामध्ये पार चक्काचूर झाल्याने जखमींची स्थिती गंभीर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.