West Bengal Bus Accident Video: पश्चिम बंगालमध्ये बस अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, 1 ठार 40 जखमी, Burdwan येथील घटना
पश्चिम बंगाल राज्यातील कटवा (West Bengal Katwa Accident) येथे प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलडून झालेल्या अपघाता 1 जण ठार तर 40 जण गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओही (West Bengal Bus Accident Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पश्चिम बंगाल राज्यातील कटवा (West Bengal Katwa Accident) येथे प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलडून झालेल्या अपघाता 1 जण ठार तर 40 जण गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओही (West Bengal Bus Accident Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघाताची घटना रविवारी (8 जानेवारी) सायंकाळच्या सुमारास घडली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पूर्व बर्दवान जिल्ह्यातील कटवा-बीरभूम महामार्गावर ही घटना घडली. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते की, तुररळक वर्दळ असलेल्या रिकाम्या रस्त्यावरुन बस निघाली होती. बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. शिवाय बसच्या छतावरही लोक दाटीवाटीने बसले होते. बसवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले आणि बस उलटली.
चालकाचे नियंत्रण सुटताच बस पलटी होऊन थेट जमिनीवर पडली. बस पलटी झाल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आणि मदत व बचाव कार्य सुरु केले. दरम्यान, सर्व जखमींना काटवा उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही बस बर्दवान शहराच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा, Viral Video: देव तारी त्याला कोणी मारी! अपघातानंतर अर्धा किलोमीटर दुचाकीवर एकटेचं राहिलं बाळ; व्हिडिओ पाहून व्हाल अवाक)
ट्विट
Today a tragic accident was happened near Jazigram-Nnagar bus stand around 3.15 pm, the bus was named Nilu (Dadhia Katwa). Wishing everyone good health. My sincere condolences to all the affected families. God bless everyone. pic.twitter.com/dFjIuF8IkJ
— Md Selim (@mdselim_785) January 8, 2023
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पिकनिक पार्टीसाठी खाजगी भाड्याने घेतलेली ही बस टीटागडकडे निघालेली सुसाट वेगाने जात होती. दरम्यान राजा रोड ट्रॅफिक सिग्नलवर वेळेवर ब्रेक न लावल्याने सिग्नलवर उभ्या असलेल्या ट्रकला ही बस धडकली. या धडकेमुळे बसच्या पुढील भागाचे गंभीर नुकसान झाले आणि चालकाचे पाय चिरडले. बसमध्ये अनेक प्रवासी, ज्यांपैकी काही मुलेही होती, जखमी झाले. जखमींचा नेमका आकडा समजू शकला नाही. सर्व जखमी प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवले आहे. या अपघातामुळे बंगालच्या रस्त्यांवर चालणाऱ्या सार्वजनिक वाहनांची नियमित देखभाल आणि रस्त्याच्या स्थिती यावरुन नव्याने चर्चा सुरु झाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2023 12:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

