Viral Video: देव तारी त्याला कोणी मारी! सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये ही म्हण खरी ठरली आहे. या व्हिडिओमध्ये आई-वडीलाचा दुचाकीवरून पडून भीषण अपघात होतो. मात्र, त्यांच्यासोबत बसलेला मुलगा दुचाकीवरच बसून राहितो. अपघातानंतर दुचाकी अर्धा किलोमीटरपर्यंत नियंत्रणाविना धावत राहिली. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, प्रथम मुलाचे आई-वडील दुचाकीवरून पडतात. मात्र भरधाव वेगात दुचाकी अर्धा किलोमीटर पुढे जात राहिली आणि ट्रक आणि कारला टाळत झुडपात जाऊन पडते. यानंतर दुचाकीवरील बाळ खाली पडले. मात्र दुचाकीचा पाठलाग करणाऱ्या काही लोकांनी लगेच जाऊन मुलाला वाचवले. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इसे कहते हैं किस्मत, आधे KM तक चलती बाइक पर मौत से सामना करता रहा मासूम#accident #trending pic.twitter.com/3nU77B9AR0
— Asianetnews Hindi (@AsianetNewsHN) January 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)