(Photo Credits: Mumbai Police)

बुल्ली बाई अॅप प्रकरणात (Bulli Bai App Case) पोलिसांची सातत्याने कारवाई सुरू असून मुख्य आरोपीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. मात्र आता या प्रकरणात तक्रारदाराला धमक्या मिळू लागल्या आहेत. तक्रारदार पीडितेने याबाबत मुंबई पोलिसांना (Mumbai Police) माहिती दिली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने सांगितले की, एका व्यक्तीने तिला फोन करून धमकी दिली की, तू तक्रार का केलीस आणि सर्व आरोपींची नावे का दिलीस. अशा वेळी इतर लोक तक्रार करायला पुढे येत नाहीत, त्यामुळे त्यांना घाबरवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हेही वाचा Sharad Pawar on ST Employee Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी आता शरद पवार मैदानात; MSRTC कृती समितीसोबत पार पडली बैठक

तक्रारदाराचा नंबर अज्ञात लोकांकडे कसा गेला याचा तपास पोलीस करत आहेत. 10 जानेवारी रोजी आरोपींना न्यायालयात हजर केले असता श्वेता सिंग आणि मयंक रावत यांना 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वीही न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती. बुल्लीबाई अॅपबाबत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.