बुलेट ट्रेनची योजना राज्याला परवडणारी नाही: काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan (Photo Credits: Facebook)

Prithviraj Chavan On Bullet Train: काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी बोलताना बुलेट ट्रेन संदर्भात एक मोठं गौप्यस्फोट केला आहे. बुलेट ट्रेनची योजना महाराष्ट्र राज्याला परवडणारी नाही तसेच हा प्रकल्प अत्यंत खर्चिक असल्यामुळे हा प्रकल्प लवकरच बंद करण्यात येणार आहे असं ते म्हणाले.

पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्प का बंद करण्यात येणार आहे, त्याची काही कारणं सांगितली आहेत. ते म्हणाले की आजच्या काळात हा प्रोजेक्ट सुरू ठेवणं योग्य नाही. कारण बुलेट ट्रेनची आज गरजही नाही. आणि म्हणूनच हा प्रकल्प राज्याच्या माथी मारणं योग्य होणार नसल्याने आम्ही हा प्रकल्प लवकरात लवकर बंद करणार आहोत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळाचं खातेवाटप कधी होणार याची सर्वच जण वाट बघत असताना, पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर पण भाष्य केलं. ते म्हणाले की राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून प्रत्येक पक्ष आपआपले मंत्री ठरवणार आहे. येत्या दोन दिवसात मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असून काँग्रेस हायकमांड (सोनिया गांधी) या संदर्भात जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. ते असंही म्हणाले की तरुणांना आणि दोन-तीन वेळा निवडून आलेल्या आमदारांना संधी मिळायला हवी.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध लिहिली आक्षेपार्ह पोस्ट; शिवसैनिकांनी घरात घुसून केली मारहाण व मुंडण

त्यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी विचारणा करण्यात आली असल्याचा खुलासा देखील त्यांनी केला. मात्र त्यांनीच नाना पटोलेंच्या नावाला पसंती दिली असल्याचं ते म्हणाले.