बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात पोलीस स्टेशन (Police Station) परिसरातच तरुणावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला (Attack) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राप्त माहितीनुसार तरुणाने पळून जाऊन प्रेमविवाह (Love Marriage) केला होता. या तरुणाने ज्या तरुणीसोबत विवाह केला तिच्या तिच्या कुटुंबीयांच्या मनात राग होता. या रागातूनच तरुणीच्या कुटुंबीयांनी हे कृत्य केल्याची माहिती आहे. ही घटना पोलीस स्टेशन बाहेरच घडली. या प्रकारानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
रघू तिवारी (वय-26 वर्षे) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. खामगाव येथील सती फैल इथल्या एका मुलीवर त्याचे प्रम होते. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. दोघांनी मिळून प्रेवविवाह केला. या विवाहास तरुणीच्या घरच्यांकडून विरोध होता. या विरोधाला कंटाळून दोघांनी पळून जाऊन लग्न केले. या विवाहावरुन दाखल झालेल्या तक्रारीवरुन जवाब नोंदविण्यासाठी तो पोलीस स्टेशनला गेला होता. या वेळी जवाब नोंदवून पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यावर मुलीच्या नातेवाईकांसोबत या तरुणाची बाचाबाची झाली. त्यातून हा हल्ला झाला. (Lucknow Shocker: वैवाहिक वादामुळे संतप्त झालेल्या नवऱ्याने बायकोला इमारतीच्या 8 व्या मजल्यावरुन फेकले)
सांगितले जाते आहे की, रघूच्या पोटात धारधार शस्त्रांनी वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा आहे. पोलीस स्टेशन जवळच ही घटना घडल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात असून, पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जातो आहे. जखमी रघूवर खामगाव येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याच्यावर पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. रघुच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.