महाराष्ट्रातील बुलढाणा (Buldana) जिल्ह्यात जवळजवळ 90 भटक्या कुत्र्यांचे (Street Dogs) मृतदेह सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देत असे म्हटले आहे की, गिरदा-सावलदाबारा रोडवर काही ठिकाणी कुत्र्यांचे शव सर्वत्र पडलेले आढळून आले. त्यांनी पुढे असे सांगितले पाच ठिकाणी 100 पेक्षा अधिक कुत्र्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामधील 90 भटके कुत्र्यांचा मृत्यू झाला असून त्यामधील अन्य काही कुत्रे जिवंत आहेत.
कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत ते सापडले. तसेच मृत कुत्र्यांचे शव सडल्याने त्यामधून फारच दुर्गंधी येत होती. गावकऱ्यांनी याबाबत स्थानिक पोलिसांना आणि वन विभागाला माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेताच त्यांना काही कुत्रे जिवंतावस्थेत मिळाले. त्यानंतर जिवंत कुत्र्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. मात्र अज्ञात आरोपीच्या विरोधात भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(नांदेड येथे वळूने दिलेल्या धडकेत महिला गंभीर जखमी)
तर कुत्र्यांच्या हत्येमागील कारण त्यांचे शवविशेच्छदन रिपोर्ट आल्यावर समोर येणार आहे. तसेच भटक्या कुत्र्यांची हत्या करणे ही एक संतापजनक आणि दु:खद घटना आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.