Image For Representations (Photo Credits: IANS)

Buldana: कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर आरोग्य विभागावर या स्थितीमुळे मोठा ताण निर्माण झाला आहे. याचसोबत रुग्णांना उपचार मिळणे सुद्धा काहीसे मुश्किल झाले आहे. याच पार्श्वभुमीवर बुलडाणा जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानुसार चक्क रुग्णालयाने बिल भरण्यासाठी रुग्णाच्या पत्नीचे मंगळसुत्र काढून घेतले. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. तर बिल भरत नाही तो पर्यंत रुग्णाला डिस्चार्ज दिला जाणार नाही असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.(Nandurbar: एक, दोन नव्हेतर चक्क 13 मुलांशी केले लग्न, सर्वांनाच फसवले; तरूणांना लुटून पळून जाणाऱ्या तरुणीला अखेर अटक) 

खामगावात ही घटना घडली असून बिलासाठी 11 हजार रुपये कमी पडत होते. त्यामुळे रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांना बिल भरण्यासाठी पैसे द्या नाहीतर मंगळसुत्र द्या असे सांगितले. यामुळे रुग्णाच्या पत्नीला रुग्णालयाला बिल भरण्यासाठी मंगळसुत्र काढून द्यावे लागले. या प्रकारामुळे रुग्णाच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर वडिलांनी असे सांगितले की, त्यांच्या बायकोने मुलाच्या उपचारासाठी कानातले दागिने गहाण ठेवले. त्यांची किंमत 28 हजार रुपये होती पण त्यांना 23 हजार रुपयेच दिले गेले.(देशात पहिल्यांदाच 24 आठवड्यांच्या गर्भाचा गर्भपात होणार; 3 मुलांच्या Abortion ला दिली Bombay High Court ने परवानगी, जाणून घ्या कारण)

तर मुलाला डिस्चार्ज मिळणार असल्याने बिल तयार करण्यात आले. तेव्हा संपूर्ण बिल भरण्यासाठी 11 हजार रुपये कमी पडत होते. तेव्हा रुग्णालयाने आधी संपूर्ण बिल भरा त्यानंतर रुग्णाला घरी घेऊन जा असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे रुग्णाला घरी घेऊन जाण्यासाठी नायलाजाने त्याच्या बायकोला मंगळसुत्र रुग्णालयाला द्यावे लागले.