BRS Leader Haribhau Rathod: यंदाचा पाऊस लांबणीवर गेल्यामुळे सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्याला देखील दुष्परिणाम सोसावे लागले आहेत. त्याच सोबत महिन्याच्या सुरुवातीला राजकीय भुंकपामुळे लोकांमध्ये खळबळ उडाली. या सर्वांच्या पार्श्वभुमीवर बीआरएसचे लीडर हरीभाऊ राठोड यांनी सरकारमकडे मागणी केली आहे. शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी तत्परतेने त्यांनी शिंदे फडणवीस सरकार कडे मागणी घातली आहे. यवतमाळमध्ये असताना शेतकऱ्यांसाठी पुन्हा नव्या पेरणीसाठी मदत करावी अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसे नाहीत,त्यामुळे सरकरने त्वरीत मदत करावी. शेचकऱ्यांच्या आत्महत्तेचे प्रमाण वाढत चालेले आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने पेरणी करण्याचीा वेळ आली आहे. या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यात 10 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे हरिभाऊ राठोड यांनी सागिंतले. तर जून महिन्यात 36 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी माध्यमांना दिले. याचपार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या वतीने हरिभाऊ राठोड यांनी सरकारकडे तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
राज्य सरकारवर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बोचरी टीका केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढतय, शेतकऱ्यांनी आत्महत्त्या करावे ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे. सरकारला यांची लाज वाटली पाहीजे. सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही अश्या बोचऱ्या शब्दांत हरिभाऊ राठोड यांनी टीका केली आहे. काही भागात अद्यापही पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणी थांबल्या आहेत. काही भागात अति पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानाला सामना करावा लागतोय.