Sharad Pawar In Breach Candy Hospital: ब्रिच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्यावर पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वी
Sharad Pawar | (Photo Credits-Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मुंबई येथील ब्रिच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात दाखल झाले आहेत. पित्ताशयावरील शस्त्रक्रिया (Gallbladder Surgery) करण्यासाठी ते रुग्णालात दाखल झाले आहेत. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलीक (Nawab Malik) यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली. दरम्यान, ही शस्त्रक्रिया पूर्वनियोजीत होती. शरद पवार यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे आगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. त्याच वेळी पुढील काही दिवसात त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे पक्षाकडून आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून माहिती देण्यात आली होती.

नवाब मलीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरीललेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रीक्रिया केली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही शस्त्रक्रिया मुंबई येथील ब्रिच कँडी रुग्णालयात पार पडली.

शरद पवार यांना 3 एप्रिल रोजी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल होता. त्या वेळीही पवार यांची प्रकृती उत्तम होती. परंतू, पुढे आणखी एक शस्त्रक्रिया करायची असल्याने डॉक्टरांनी शरद पवार यांना 15 दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार हे मुंबई येथील निवासस्थान सिल्वर ओक येथे पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार, कन्या सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे हे देखील उपस्थित होते. (हेही वाचा, Sharad Pawar Heath Update: शरद पवार यांना Breach Candy रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला)

पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरद पवार हे ब्रिच कँडी रुग्णालयात 30 मार्च रोजी दाखल झाले. ते रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी सर्व तपासण्या करुन त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या पित्ताशयातून खडा काढण्यात आला. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीला आराम पडला. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांनी 15 दिवस विश्रांती घेतली. त्यानंतर आता पुन्हा ते शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.