Akola Crime: प्रेमप्रकरणातून बापाने मुलाची केली हत्या, अकोल्यातील धक्कादायक घटना
Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Akola Crime: अकोला जिल्ह्यात एका बापाने तरुण मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलानं अनुसूचित जाती वर्गातील मुलीवर प्रेम केल्याचे समजताच बापाने टोकाचं पाऊल उचलत हत्या केली आहे.या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. आरोपी वडिलांनी दुसऱ्या मुलाच्या मदतीनं मुलाची हत्या केली. ही घटना अकोल्यातील पिंजर गावात घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी वडिल आणि दुसरा मुलगा बाहेरगावी गेले होते. (हेही वाचा- नागपूरमध्येही पोलिसांकडून गुन्हेगारांची परेड)

मिळालेल्या माहितीनुसार, संदिप नागोराव गावंडे  (वय 26) असं मृत तरुणाची ओळख झाली आहे. नागोराव कर्णाजी गावंडे असं आरोपी वडिलांचे नावे आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवा गावात काल दुपारी 12च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.  संदीपचा मृतदेह घरात हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडला होता. परंतु त्याच्या घरचं सर्वजण बाहेर गावी गेले होते. त्यानंतर कुटुंबातील काही जण घरी आले आणि त्यावेळी संदिपचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पिंजर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि तरुणाच्या मृत्यूचा तपास सुरु केला.

पोलिसांनी वडिलांची चौकशी करताच, त्यांच्यावर संशय केला. चौकशी वडिलांचं बिंग फुटलं आणि सर्व हकिकत समोर आली. पोलिसांनी आरोपी वडिलांना आणि दुसऱ्या मुलाला ताब्यात घेतलं. संदिपचं दुसऱ्या जातीच्या मुलीशी प्रेम होते आणि ते प्रेम वडिलांना मान्य नव्हतं. ते दोघे ही पळून जाऊन लग्न करणार होते हे घटना लक्षात येताच संदीला संपवून टाकायचं ठरवलं. संदिप पुण्याला कंपनीत काम करायचा. घरी आल्यानंतर दोघांमध्ये सतत वाद व्हायचं. त्यानंतर काल दुपारी पुन्हा वाद घातलं वडिलांनी त्याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचे हात पाय बांंधून ठेवलं.

पोलिसांच्या समोर मुलाला कोणीतरी मारून टाकल्याचा बनाव वडिलांनी रचला पण पोलिस सर्व घटनाचा तपास करत आरोपी पर्यंत पोहचले. आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.