Nagpur Police: नागपूरमध्येही पोलिसांकडून गुन्हेगारांची परेड, गुन्हेगारांना सज्जड दम

पुण्याचे नवनियुक्त पोलीस (Pune Police) आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांना दोन दिवसांपूर्वी चांगलाच दणका दिला होता.  पुण्यापाठोपाठ आता नागपूरमध्येही गुन्हेगारांची ओळख परेड काढण्यात आली. नवे पोलीस आयुक्त  डॉ. रवींद्रकुमार सिंगल (Dr. Ravinder Kumar Singal) यांनी कुख्यात गुंडांना आयुक्तालयात बोलावून सज्जड दम भरला आहे. नागपूर शहरात शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना आणि पुन्हा गुन्हेगार सक्रीय होत असल्याने, त्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तांनी  (Nagpur Police) रेकॉर्डवरील 137 गुन्हेगारांना सज्जड दम दिला.

पाहा व्हिडिओ -

नागपूर शहरात इथून पुढे कुठल्याही गुन्ह्यात नाव आढळून आल्यास परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचा इशारा यावेळी पोलीस आयुक्त  डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मकोका, खून, हल्ला करणे, लुटपाट, एनडीपीएस यांच्यासह इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रीय असलेल्या गुन्हेगारांना आयुक्तालयात बुधवारी ओळख परेडसाठी बोलाविण्यात आले होते.

नागपूर शहरातील विविध गुन्ह्यांमधील टॉप 137 गुन्हेगारांना बुधवारी सिंगल यांनी पोलीस आयुक्तालयात बोलवत  कायद्याचा 'डोस' दिला. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या परेडमुळे गुन्हेगारांमध्ये देखील एकच खळबळ उडाली होती. दुपारी पोलीस आयुक्तांनी प्रत्येकाशी व्यक्तीशा बोलून त्यांना यापुढे एकही गुन्हा घडल्यास त्यांची खैर नसल्याचा इशारा दिला.