मुंबई येथील बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ (Borivali Railway Station) पाहारा देत असताना एका आरपीएफ कॉन्स्टेबलचा ( RPF Constable) रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना पुढेयेत आहे. प्रसारमाध्यमांनी जीआरपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत कुमार प्रजापती असे त्याचे नाव आहे. तो बोरिवली रेल्वे स्थानकात कर्तव्यास असल्याचे समजते. भरत कुमार प्रजापती हा पोईसरजवळ त्याच्या सहकाऱ्यासह गस्त घालत असताना चर्चगेटहून बोरिवलीकडे येणाऱ्या डाऊन लोकल ट्रेनने त्याला धडक दिली.
बोरिवली येथील आरपीएफ जवानाच्या अपघातासंदर्भात मीडडेने दिलेल्या वृत्तानुसार, पोईसरजवळ कोणीतरी ट्रेनवर दगडफेक केल्याचा कॉल आला होता. त्यामुळे सदर ठिकाणी गस्त घालण्यासाठी प्रजापती हा दुसर्या एका कॉन्स्टेबलसह पडताळणी करण्यासाठी गेले होता.
दरम्यान, कॉन्सेटबल जेव्हा स्थानिकांकडे दगडफेकीसंदर्भात चौकशी करत होते त्याच वेळी पाठिमागून ट्रेन आली आणि त्यााल धडक बसली. दरम्यान, सदर घटनेची नोंद अपघाती मृत्यू (ADR) अशी घेण्यात आली आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्रजापती हा मुळचा गुजरातमधील पालनपूरचा आहे. रेल्वे प्रशासनाने सदर अपघाताबद्दल त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना माहिती दिली आहे.