बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani Arrested) याला मुंबई (Mumbai Police) पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरात राज्यातून अटक केली आहे. गुजरात (Gujarat) राज्यातील नेमक्या कोणत्या ठिकाणाहून त्याला अटक केली आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. अनिल जयसिंघानी (Bookie Anil Jaisinghani) याला मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना ब्लॅकमेल करणे आणि धमकी देणे, कट रचणे, लाच देण्याचे आमिष दाखवणे आदी आरोपांखाली अनिल याची मुलगी आनिक्षा जयसिंघानी हिस आगोदरच अटक करण्यात आली आहे. आता स्वत: अनिल जयसिंघानी यालाच अटक झाल्याने अनेक धागेदोरे पुढे येण्याची शक्यता आहे.
अनिल जयसिघानी हा आर्थिक विश्वातील मोठा गुन्हेगार असल्याचे पुढे आले आहे. त्याच्या नावावर यापूर्वी 15 गुन्हे दाखल आहेत. तो पाठिमागील सात वर्षांपासून फरार होता. केवळ महाराष्ट्र पोलीसच नव्हे तर महाराष्ट्रासह पाच राज्यांचे पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, काही ना काही कारणांनी तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. तो सातत्याने आपली प्रकृती खराब असल्याचे कारण देत पोलिसांपासून दूर राहात होता. तो सातत्याने आपले ठिकाण बदलत असे. तो कोणत्याही प्रकारे फोन अथवा सिमकार्ड वापरत नव्हता. तो प्रसारमाध्यमांशी स्वत:हून संपर्क करत असे. पण, पोलिसांमध्ये हजर होत नव्हता. त्याचा फोन क्रमांक नेहमीच बंद असायचा. तो नेहमी व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करत असे. आता त्याला मुंबई पोलिसांकडून अटक झाल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे पुढे येणार आहेत. (हेही वाचा, Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांची मुंबई पोलिसांत तक्रार, एक कोटी रुपयांची लाच आणि धमकीसह कट रचल्याचा डिझायनरवर आरोप; जाणून घ्या)
ट्विट
Accused Anil Jaisinghani arrested from Gujarat by Mumbai Crime Branch for allegedly threatening and blackmailing Amruta Fadnavis, wife of Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis. He was on the run.
— ANI (@ANI) March 20, 2023
अनिल जयसिंघानी हा कुख्यात बुकी म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि असम पोलीस त्याच्या मागावर होते. गुजरात पोलिसांनी मे 2015 मध्ये ईडी आणि गुजरात पोलिसांच्या पथकाने जयसिंघानी याच्या दोन घरांवर छापा टाकलो होता. त्या वेळी त्याच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मुंबईतील दोन पोलीस स्टेशनमध्ये अनिल जयसिंघानी याच्या विरोधात 2016 मध्ये फसवणूक आणि कट रचणे या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.