यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमातील दुसऱ्या वर्षातील इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्या बद्दल संतापजनक उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये सावरकर हे 'दशहतवादी, जहालवादी' असल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने यावर आक्षेप घेतला असून पुस्तकात छापलेला हा उल्लेख काढून टाकावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल लिहिण्यात आलेल्या या वादग्रस्त शब्दांमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे टाईम्स ऑफ इंडियाने सांगितले आहे.
2001 रोजी हे पुस्तक लिहिण्यात आले होते. यासाठी मराठी माध्यामाच्या पुस्तकात सावरकरांबद्दल असे शब्द वापरले आहेत. तसेच सावरकांसाठी उल्लेख केलेले शब्द हे त्यांच्यासाठी उद्देशून नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता टीका केल्यानंतर पाठ्यपुस्तकातील सावरकारांच्या उल्लेखनावर बदल करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे गुरुकुल ई. वायूनंदन यांनी दिली आहे. (हेही वाचा-'सम्राट' कायमचा 'बंद' झाला: जॉर्ज फर्नांडिस यांना राज ठाकरे यांची व्यंगचित्रातून आदरांजली)
ऐतिहासिक लढ्यात संघर्ष करणाऱ्या थोर नेत्यांबद्दल सध्याच्या काळात असे शब्द वापरणे म्हणजे अपनाकारक आहे. तसेच स्वातंत्र्य सैनिकांकडून अनेक तरुण मंडळी प्रेरणा घेत असतात. त्यामुळे असे शब्द पाठ्यपुस्तकात वापरणे चुकीचे असल्याचे सांगितले जात आहे.