मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro 3) च्या कुलाबा वांद्रे सीप्झ (Coloba-Bandra Seepz) मार्गावरील प्रकल्पासाठी आरे कॉलनीत उभारण्यात येणारी कारशेड हा सद्य घडीचा ज्वलंत विषय ठरला आहे. आरे मधील कारशेड साठी तब्बल 2 हजार 185 झाडांची तोड व 461 झाडांचे अन्य ठिकाणी पुनर्रोपण करण्याच्या मुद्द्यावर प्रश्न करत पर्यावरणप्रेमी झोरू भथेना (Zoru Bhathena) व 'वनशक्ती' (Vanshakti) स्वयंसेवी संस्थेने याचिकाकेल्या आहेत. तर मागील कित्येक दिवस सामान्य नागरिक ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी पुढे येऊन आंदोलने करत वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे, या सर्व आंदोलनकर्त्यांच्या व याचिकांच्या सवालांना आज मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) उत्तर मिळणार आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाकडून आज सकाळी याबाबतचे सर्व निर्णय सुनावले जातील.
मागील काही दिवसात आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून अनेक प्रश्न केले जात होते. मुंबई वृक्ष प्राधिकरणाने वृक्षतोडीसाठी दिलेली परवानगी वैध आहे का? आरे कॉलनी हे वनक्षेत्र आहे का? तसेच मेट्रो कारशेडची उभारणी मिठी नदीच्या पूरक्षेत्रात होत आहे की नाही? याबाबत शहानिशा व्हावी अशी मागणी होत होती. याच पार्श्ववभूमीवर मुंबई उच्च न्यायालायने झाडे तोडण्याच्या कामाला स्थगिती दिली होती, तसेच 30 सप्टेंबर रोजी याबाबत सुनावणी घेण्यात आली होती. यावेळेस न्यायाधिशांनी घेतलेला निर्णय राखून ठेवणायत आला हित व आज याबाबत सुनावणी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास आरे येथील झाडे न तोडण्याचे आदेश, पुढील सुनावणी 30 सप्टेंबरला
दरम्यान, शिवसेनेसह मुंबईतील अनेक राजकीय पक्षांनी आरे मधील वृक्षतोडूच्या निषेधार्थ पवित्र स्वीकारला असताना मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मेट्रो-03 प्रकल्पासाठी आरे परिसरात कारशेड उभारणे सर्वाधिक सोयीचे आहे असे मत व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलत असताना, "पर्यावरण वाचवणे म्हणजे केवळ वृक्ष वाचवणे नव्हे तर वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करणे हा देखील याचाच भाग आहे , जे मेट्रोमुळे शक्य होणार आहे असे मत भिडे यांनी व्यक्त केले होते.