मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी चार आरोपींना जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालय (Photo credit : Youtube)

मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) शुक्रवारी सकाळी मालेगाव बॉम्बस्फोट(Malegaon Blast)  प्रकरणी चार आरोपींना जामीन देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. आज, न्यायमूर्ती आय. ए. महंती व ए. एम बदर यांच्या खंडपीठाने धन सिंग (Dhan Singh), लोकेश शर्मा (Lokesh Sharma), मनोहर नरवारीया (Manohar Narwaria) आणि राजेंद्र चौधरी (Rajendra Chaudhary) या चार आरोपींना जमीन मंजुर केला आहे. 2006 मध्ये मालेगाव येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी या चौघाना 2013 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने जामिनाची याचिका फेटाळून लावल्यावर त्यांनी 2016 मध्ये उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. या प्रकरणी आज उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

या चौघांना यापुढे सुनावणीसाठी कोर्टात उपस्थित राहण्याची ताकीद देत व 50 हजार रुपये दंड आकारून जामीन देण्यात आला.तसेच पुराव्यांशी कोणतीही छेडछाड व साक्षीदारांशी संपर्क न साधण्याची तंबी देण्यात आली आहे.

ANI ट्विट

मालेगाव मध्ये हमीदिया मशिदीच्या लगतच्या दफनभूमीत बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता, यामध्ये 37 लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून 100 हुन अधिक जण जखमी झाले होते. याप्रकरणी तपास करत असताना महाराष्ट्र दहशतवाद विरोधी संघाने सुरवातीला चौकशी करून अल्पसंख्यांक वर्गातील नऊ जणांना ताब्यात घेतले होते. यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे व त्यांनतर राष्ट्रीय अन्वेषण संस्थेकडे सोपवण्यात आले होते. त्यांच्या तपासानुसार हा हल्ला बहुसंख्यांकांपैकी लोकांनी घडवून आणल्याचे समजत होते. या तपासानंतर नऊ जणांना निर्दोष सोडून या संबंधित चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह सातही आरोपींवरील आरोप निश्चित

मात्र आता याप्रकरणी या चार आरोपींना देखील जामीन देण्यात आला आहे. यासोबतच न्यायालायने इतर नऊ संशयितांना सोडून दिल्याच्या व या चौघांची याचिका फेटाळल्याच्या विरुद्ध उच्च न्यायलायत अपील केला होता. याबाबत उच्च न्यायलायत येत्या दिवसात सुनावणी होणार आहे.