PMC Bank | File Photo

मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court) आज (4 नोव्हेंबर) पीएमसी खातेदारांनी ( PMC Bank) आरबीआय (RBI) विरोधात केलेल्या याचिकांवर सुनावणी पार पडली आहे. यामध्ये न्यायालयाकडून आरबीआयला 13 नोव्हेंबर पर्यंत अ‍ॅफिडेव्हिट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पुढील सुनावणी 19 नोव्हेंबर दिवशी होणार आहे. मागील दीड महिन्यांपासून पीएमसी बॅंकेवर आर्थिक निर्बंध घालण्यात आल्याने खातेदारांना अकाऊंटमधून विशिष्ट रक्कमेच्या पलिकडे पैसे काढणं कठीण झालं आहे. पीएमसी बॅंकेतील 9 लाख ठेवीदारांना मिळणार दिलासा; आरबीआयने घेतला हा मोठा निर्णय.

ANI Tweet

हक्काचे पैसे अडकल्याने आर्थिक विवंचनेत अडकलेल्या अनेक पीएमसी बॅंक खातेदारांची गैरसोय होत आहे. यामध्ये तणावाखाली येऊन 7-8 पीएमसी बॅंक खातेदारांचा मृत्यू झाला आहे. गुरूनानक विद्यक सोसायटी या संस्थेनेही अॅड. क्रांती एल. सी. यांच्या कडून आरबीआयचा निषेध करत त्यांना पीएमसीवर असे निर्बंध घालण्याचे कायदेशीर अधिकार नसताना आदेश दिल्याचं सांगत आता न्यायालयात धाव घेतली आहे. काही दिवसांपूर्वी पीएमसी बॅंक धारकांनी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन केले होते.