Pune Sessions Court ordered the release of Anand Teltumbde (Photo Credits: Twitter/@@AnandTeltumbde)

Anticipatory Bail Application of Professor Anand Teltumbde: माओवाद्यांशी आणि  भीमा -कोरेगाव (Bhima Koregaon case) येथील हिंसाचाराशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) 27 फेब्रुवारी 2019 पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे. Bhima Koregaon case: सूधा भारद्वाज, वरावरा राव यांच्यासह इतरांवर तब्बल 1,837 पानांचे आरोपपत्र

काही तांत्रिक कराणांमुळे सुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात आली होती, त्यानुसार आता न्यायाधीश नितीन सांबरे यांनी या प्रकरणी पुढील सुनावणी 27 फेब्रुवारी 2019  दिवशी ठेवली आहे. तोपर्यंत तेलतुंबडेंना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.

भीमा - कोरेगाव हिंसाचारामध्ये नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आनंद तेलतुंबडे यांना सोडण्याचे आदेश 2 फेब्रुवारी दिवशी पुणे न्यायालयाने (Pune Sessions Court) दिले होते. आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाने म्हटलं होत.