Bomb Threat at Pune Railway Station: आज सकाळी पुणे रेल्वे स्थानकाला (Pune Railway Station) बॉम्बची धमकी (Bomb Threat) मिळाली. सकाळी 9 वाजता एका अज्ञात व्यक्तीने पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. पोलिसांनी त्वरीत सखोल कारवाई करून प्रत्युत्तर दिले. प्लॅटफॉर्म 2 वर तपासणी करण्यात आली. परंतु, याठिकाणी कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत.
प्राप्त माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरातील रावेत येथील 40 वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत फोन केल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या व्यक्तीला तत्काळ ताब्यात घेतले. खोटी आणि दुर्भावनापूर्ण धमकी दिल्याबद्दल या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. (हेही वाचा -IndiGo चं Jabalpur-Hyderabad विमान बॉम्ब च्या धमकीने नागपूरला वळवलं; Flight 6E 7308 मधील सारे प्रवासी सुरक्षित)
ऑगस्टमध्ये पिंपरीतील तीन रुग्णालयांमध्ये निगडी, भोसरी आणि चिंचवड येथील परिसरात बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. यासंदर्भात अज्ञात व्यक्तीने ईमेल द्वारे धमकी दिल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. तथापी, रुग्णालय व्यवस्थापनांनी यासंदर्भात पोलिसांना सतर्क केले होते. पोलिसांनी संभाव्य धोक्याचा तपास करण्यासाठी परिसरात बॉम्ब शोधक आणि निकामी पथक तैनात केले होते. (हेही वाचा - Fresh Bomb Threats To 25 Flights: बॉम्ब धमक्यांचे सत्र काही थांबेना! 25 हून अधिक फ्लाइट्सला बॉम्बची धमकी)
लखनौमधील 3 स्थानकांना बॉम्बची धमकी -
रविवारी एका अज्ञात कॉलरने डायल 112 आपत्कालीन सेवेद्वारे लखनौमधील तीन स्थानकांना बॉम्बची धमकी दिली. सकाळी 8 वाजता आलेल्या कॉलमध्ये हुसेनगंज मेट्रो स्टेशन, चारबाग रेल्वे स्टेशन आणि आलमबाग बस स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. यानंतर स्थानकावर सुरक्षा दलांसह पोलिस तैनात करण्यात आले. या धमकीचा तपास करण्यासाठी बॉम्ब निकामी आणि श्वान पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली.