Photo Credit -X

Boat Capsized in Ujani Dam: उजणी धरण(Ujani dam) पात्रात काल मंगळवारी संध्याकाळी प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटल्याची घटना घडली. माहिती मिळताची बचाव कार्य (Search Operation) सुरू करण्यात आले. मात्र, या घटनेतील 6 जण अद्याप बेपत्ता (6 People Drown Ujani Dam)आहेत. तर एक जीव बचावला आहे. पोहता येत असल्याने तो किनाऱ्यावर पोहचला. अशी माहिती समोर आली आहे. मंगळवारी संध्याकाळी धरण पात्रात वादळीवारे सुरू होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा अंदाज आहे. (हेही वाचा:Boat Capsized in Jhelum River : झेलम नदीत बोट उलटल्याने 10 विद्यार्थ्यांसह अनेक जण नदीत बुडले; रेस्क्यू ऑपरेशन सुरू )

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळशी गावाजवळ संध्याकाळी ही दुर्घटना घडली. यात सहा जण बेपत्ता झालेत. कृष्णा जाधव 28 वर्ष, कोमल जाधव 25 वर्ष, वैभवी जाधव 2.5 वर्ष, समर्थ जाधव 1 वर्ष रा. झरे ता. करमाळा, गौरव डोंगरे 21 वर्ष, अनिकेत अवघडे 21 वर्ष रा कुगांव. ता. करमाळा अशी बेपत्ता असलेल्यांची नावे आहेत.(हेही वाचा: Boat Capsized in Central African Republic: मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये बोट उलटून मोठी दुर्घटना; 50 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, शोध मोहिम सुरू)

घडना घडल्यानंतर मंगळारी रात्री जवळपास 9 वाजता शोध मोहिम थांबविण्यात आली. आज सकाळी पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात आली. NDRF ची टीम कळशी गावात पोहचली आणि तिने शोध मोहिम सुरु केली आहे. शोध मोहिमेसंबंधीचा एक व्हिडिओ पण समोर आला आहे.

नेमकं काय घडलं

करमाळा तालुक्यातील कुगाव येथील सात जणं बोटीने इंदापूर तालुक्यातील कळशी येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान धरण पात्रात वादळी वारे वाहू लागल्याने प्रवासात अडथळे येत होते. वादळीवाऱ्याने ही बोट उलटली. बोट धरण पात्रात बुडली. या नावेत एक वर्षांच्या मुलासह एकूण सात प्रवासी होते. त्यातील एक प्रवाशी पोहता येत असल्याने पोहत किनाऱ्यावर आला. बाकींचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.